What is a Gazette and what are the documents needed to Gazette and benefits of the Gazette/गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे /




गॅझेट म्हणजे काय व गॅजेट काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे आणि गॅझेट चे फायदे


गॅझेट साठी लागणारी कागदपत्रे

प्रत्येक क्रमांक मधील फक्त एक कागदपत्र लागेल
1)एक फोटो
2)आधार कार्ड/पॅन कार्ड/इलेक्शन कार्ड/ पासपोर्ट
3)राशन कार्ड/लाईट बिल
(आधार कार्डवर पत्ता बरोबर असेल तर (3)नंबर मध्ये जे डॉक्युमेंट आहेत त्यांची गरज नाही जर पत्ता जुन्या ठिकाणी राहात असाल तिकडचा असेल तर यातील एक घ्यावा म्हणजे राशन कार्ड किंवा लाईट बिल)
4)जन्म दाखला/शाळेचा दाखला किंवा बोनाफाईट
5)जुने नाव आणि नवीन नाव
6) मोबाईल नंबर
7)मॅरेज सर्टिफिकेट किंवा 100 च्या बॉंड पेपर वर प्रतिज्ञापत्र.

गॅझेट बनवण्याचे फायदे खालील प्रमाणे आहेत

1)एखाद्या व्यक्तीची दोन वेगवेगळी नावे आहेत व त्या व्यक्तीला दोन्ही नावाचा वापर करायचा आहे तर तो व्यक्ती गॅजेट चा वापर करू शकतो याच्या वापराने तो सरकारी व प्रायव्हेट दोन्ही ठिकाणे आपली कागदपत्रे वापरू शकतो

2) नवीन लग्न झाल्यानंतर पत्नीचे नाव हे काही धर्मांमध्ये बदलून नवीन ठेवले जाते . पत्नीचे सर्व कागदपत्र हे लग्नाच्या अगोदर च्या नावाने असतात त्यामुळे तिला नोकरीसाठी व सरकारी कामांमध्ये अडचण येते यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे गॅझेट ची सुविधा आहे जर त्या व्यक्तीने ग्याजेट बनवले तर ती व्यक्ती लग्नाच्या अगोदर चे नाव ही वापरू शकते व लग्नाच्या नंतरचे नाव ही वापरू शकते

3) मुस्लिम बांधवांची नावे काहीवेळा आम्ही बघतो
अब्दुल करीम ऐवजी अ.करीम
अब्दुल सत्तार ऐवजी अ.सत्तार
मोहम्मद जावेद ऐवजी म.जावेद असतात अशा प्रकारे असतात यासाठी त्यांनी जर गॅजेट केले तर कुठल्याही सरकारी कामासाठी ती व्यक्ती अब्दुल करीम आणि करीम दोन्ही नावाची पुरावे वापरू शकतात कारण गॅझेटमध्ये दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे याचा उल्लेख असते

4)एखाद्या व्यक्तीचे नाव काही कागदपत्रांवर वेगळे व काही कागदपत्रांवर वेगळे असे झाले असेल तर ती व्यक्ती ही गॅजेट करू शकते गॅझेट केल्यानंतर त्याचे जे नाव बरोबर आहे त्या नावाचं ती व्यक्ती सर्व ठिकाणी वापर करू शकते.

5) जन्मतारीख चुकले असेल तर जी जन्मतारीख बरोबर आहे त्यासाठीही गॅझेट चा वापर करू शकतो

गॅझेट ची म्हणजे  काय ?

              गॅझेट ऑफ इंडिया हा एक सार्वजनिक जर्नल आहे आणि भारत सरकारचा अधिकृत कायदेशीर दस्तऐवज आहे,

गॅझेटची इतर माहिती 


 [१] प्रकाशन विभाग, गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे आठवड्यात प्रकाशित केला जातो. सार्वजनिक जर्नल म्हणून, गॅझेट सरकारकडून अधिकृत नोटिसा छापते. ही सामग्रीमधील अधिकृत आहे, अचूक आणि काटेकोरपणे सरकारच्या धोरणांनुसार आणि निर्णयानुसार. हे शासनपत्र भारत सरकार प्रेस द्वारे छापलेले आहे.

[२]सामान्य गॅझेट्स आठवड्याच्या विशिष्ट दिवशी नियमितपणे आठवड्यातून प्रकाशित केले जातात तर अधिसूचित होण्याच्या निकडांवर अवलंबून दररोज विलक्षण राजपत्रे प्रकाशित केली जातात.

                   मंत्रिमंडळ सचिवालयाद्वारे वेळोवेळी जारी केलेल्या भारत सरकार (व्यवसाय नियमांचे वाटप) नुसार राजपत्रातील प्रकाशन अंमलात आणले जाते.
                          प्रकाशन विभागाचे प्रकाशन दोन सहाय्यक नियंत्रक, एक आर्थिक अधिकारी आणि सहाय्यक संचालक यांच्या सहाय्याने प्रकाशन नियंत्रक यांच्या अध्यक्षतेखाली असते. नवी दिल्लीतील बांधकाम भवन येथे मुख्यालय असलेल्या नगरविकास मंत्रालयाच्या देखरेखीखाली राजपत्रात 270 हून अधिक लोक कार्यरत आहेत.
                        प्रकाशन नियंत्रक हे अधिकृत प्रकाशक, कस्टोडियन आणि भारत सरकारच्या प्रकाशनांचे विक्रेता आणि नियतकालिक यासह भारतीय राजपत्र आणि दिल्ली राजपत्र यासहित नियतकालिक आहेत. हे विविध मंत्रालये / विभागांनी जाहीर केलेल्या सर्व विक्रीयोग्य प्रकाशनांचे संग्रहण, विक्री व वितरण करते.नगरविकास मंत्रालयाने २००8 मध्ये राजपत्रातील इलेक्ट्रॉनिक आवृत्ती प्रकाशित करण्यास सुरवात केली.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

New Ration Card / Remove Name and Add Name Documents / नवीन राशन कार्ड व नाव कमी व चढवणे यासाठी लागणारी कागदपत्रे

Passport Documents And Other Information / पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती