New Ration Card / Remove Name and Add Name Documents / नवीन राशन कार्ड व नाव कमी व चढवणे यासाठी लागणारी कागदपत्रे
नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी दोन मार्ग असतात, ते खालील प्रमाणे आहेत.
1) घराची घरपट्टी स्वतःच्या नावावरती पाहिजे अशी घरपट्टी पाहिजे जा घरपट्टीवर राशन कार्ड रजिस्टर नसेल , म्हणजे नवीन राशन कार्ड करण्यासाठी नवीन घराची घरपट्टी आवश्यक असते.
2) स्वतःचं घर नसेल आणि भाड्याच्या घरामध्ये भाड्याने राहत असाल तर भाडे चा करार 3 वर्षाचा बनवून ही नवीन राशन कार्ड बनवता येते.
स्वतःच्या नावे घरपट्टी असेल तर
जर स्वतःच्या नावे घरपट्टी नसेल तर(भाड्याने राहत आसाल तर )
1) वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे.(1 ते 12)
2) ज्या घरामध्ये भाड्याने राहतो तिकडचा तीन वर्षाचा भाडे चा करार घर मालकाबरोबर.
3) भाड्याने राहतो त्या घराचा असेसमेंट उतारा घरमालकाच्या नावाने.
1) घराची घरपट्टी स्वतःच्या नावावरती पाहिजे अशी घरपट्टी पाहिजे जा घरपट्टीवर राशन कार्ड रजिस्टर नसेल , म्हणजे नवीन राशन कार्ड करण्यासाठी नवीन घराची घरपट्टी आवश्यक असते.
2) स्वतःचं घर नसेल आणि भाड्याच्या घरामध्ये भाड्याने राहत असाल तर भाडे चा करार 3 वर्षाचा बनवून ही नवीन राशन कार्ड बनवता येते.
वरील मुद्द्यांची माहिती आपण आता सविस्तर बघूया
स्वतःच्या नावे घरपट्टी असेल तर
1)नवीन राशन कार्ड बनवण्यासाठी एक फॉर्म जे तुम्हाला सेतीमध्ये मिळून जाईल.
2)जुन्या राशन कार्ड वरील नावं कमी करण्याची पावती व त्या पावतीची झेरॉक्स.
3)घराचा असेसमेंट,असेसमेंट वर राशन कार्ड बनवणारे चे नाव पाहिजे( अर्जदाराचे स्वतःचे नावे).
4) उत्पन्न दाखला चालू आर्थिक वर्षाचा आवश्यक.
5) आधार कार्ड - अर्जात नमूद सर्व व्यक्तींची आवश्यक.
6) गॅस बुक ची झेरॉक्स अथवा गॅस एजन्सी दाखला.
7) पासपोर्ट साईज दोन फोटो.
8) बँक पासबुकची झेरॉक्स.
9) ज्या राशन कार्ड मधून नाव कमी केले आहे त्या राशन कार्डची झेरॉक्स .
10) निवडणूक ओळखपत्र.
11) लाईक बिलची ची झेरॉक्स.
12) सरपंच व पोलीस पाटील यांचे रहीवासी दाखले नगर परिषदेच्या हद्दी मध्ये राहत असाल तर नगरसेवक यांचा दाखला.
1) वरील प्रमाणे सर्व कागदपत्रे.(1 ते 12)
2) ज्या घरामध्ये भाड्याने राहतो तिकडचा तीन वर्षाचा भाडे चा करार घर मालकाबरोबर.
3) भाड्याने राहतो त्या घराचा असेसमेंट उतारा घरमालकाच्या नावाने.
Remove Name From Ration card required document / राशन कार्ड मधून नाव कमी करण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) नाव कमी करायचा अर्ज नमुना 1 ( हे फॉर्म आपल्याला सेतू मध्ये मिळेल )
2) मूळ रेशन कार्डची झेरॉक्स व ओरिजनल ही सोबत घेणे
3)कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड ची झेरॉक्स ज्यांची नावे राशन कार्ड वर आहेत
4) नाव कमी करण्याचे कारण त्यासाठी मृत्यू दाखला, विवाह नोंदणीचा दाखला,जन्मदाखला
5)अर्जदाराचा फोटो
Add Name In Ration card required document / राशन कार्ड मध्ये नाव चढवण्यासाठी लागणारी कागदपत्रे
1) नाव चढवण्याचा अर्ज नमुना -8 ( हे फॉर्म आपल्याला सेतू मध्ये मिळेल )
2) मूळ रेशन कार्डची झेरॉक्स व मूळ राशन कार्ड ही सोबत घेणे.
3)कुटुंबातील सर्व सदस्यांचे आधार कार्ड ची झेरॉक्स ज्यांची नावे राशन कार्ड वर आहेत.
4) नाव कमी करण्याचे कारण त्यासाठी मृत्यू दाखला, विवाह नोंदणीचा दाखला,जन्मदाखला.
5)अर्जदाराचा फोटो .
6)नवीन लग्न झालं असेल तर जुन्या राशन कार्ड मधून नाव कमी करण्याची मूळ पावती व झेरॉक्स.
7)सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा रहिवासी दाखला.
8)राशन कार्ड मधून नाव कमी केलेल्या पावती ला जर सहा महिने होऊन गेले असतील तर शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र
टीप - सरकारी नियम बदलत असतात त्यामुळे कागदपत्रे कमी-जास्त होऊ शकतात
If you have any inquiry about this service please comment I will reply you
उत्तर द्याहटवा