Passport Documents And Other Information / पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती
पासपोर्ट साठी लागणारी कागदपत्रे आणि पासपोर्ट ची इतर महत्वाची माहीती आज कल पासपोर्ट ही प्रत्येक व्यक्तीची गरज बनली आहे देशाबाहेर आंतरराष्ट्रीय प्रवास करणे देखील दिवसेंदिवस सोपे होत आहे दुसऱ्या देशात नोकरी करणे किंवा मित्रांसह एखाद्या देशात जाणे देखील सामान्य होत आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे पासपोर्ट असणे अनिवार्य गोष्ट बनली आहे.पासपोर्ट काढण्यासाठी कुठल्याही वयाची अट नसते व सर्व सामान्य माणूस सुद्धा पासपोर्ट बनवून घेऊ शकतो पासपोर्ट बनवण्यासाठी खालील कागदपत्रे लागतात. पासपोर्ट मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे 18 वर्षाखालील मुलगा किंवा मुलगी चे जर पासपोर्ट काढायचे असेल तर त्यासाठी लागणारी कागदपत्रे. 1)आधार कार्ड 2)जन्मदाखला 3)शाळेचे बोनाफाईट 4)शाळेचे आयडी कार्ड 5)एक फोटो 6)बँक पासबुक (आई-वडिलांचे) 7)आई-वडिलांचे जर पासपोर्ट असतील तर तर दोन्ही पासपोर्ट 8)आई-वडील दोघे ही पासपोर्ट ऑफिसमध्ये हजर पाहिजेत(जर वडील देशाच्या बाहेर असतील तर त्यांच्या पासपोर्टची झेरॉक्स लागेल)...